याच दरम्यान अभिनेता सुनील बर्वे यांनीही आजच्या नवीन पिढीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली… हे सगळे होत असतानाच अभिनेते आणि निर्माते प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे यांची खास भेट घेतली आणि आपल्या नाटकाची स्क्रिप्ट त्यांना दिली. आणि या भेटीनंतर एक मोठी घोषणा करण्यात आली. ती म्हणजे नाटकाची. अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!” असं या नाटकाचं नाव असून, हे नाटक लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे.
यात हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे यांच्यासोबत अक्षर कोठारी, शर्मिला शिंदे, शंतनू ठवळी आणि वैशाली आंबवणे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. लेखक अमोल पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाची निर्मिती नंदू कदम यांनी केली आहे.
एक मात्र नक्की… इतक्या दमदार कलाकारांची फळी एकत्र आली, तर मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा ''हाऊसफुल'' चा बोर्ड झळकणार, यात शंका नाही !

