सोलापूर : एक विवाहीता तिची दोन लहान मुले आणि वडिलांसह बेपत्ता झाली आहे. ही घटना नजरेवाडी परिसरातील राजीव गांधी नगरात 08 एप्रिल च्या सायंकाळी घडली. या चौघांचा सर्वत्र शोध घेतला असता, ते मिळून न आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर बेपत्ता रजिस्टरला नोंद झाली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, भांडेगाव येथील रहिवासी सौ. शाहीस्ता बेगम ही तिची दोन मुले सात वर्षीय मुलगी कु. इन्शा अमीन, सहा वर्षीय मुलगा तैमुर अमीन आणि तिचे वडील सलीम अमीर सय्यद (वय-49 वर्षे) असे चौघे 8 एप्रिल च्या सायंकाळी मजरेवाडी परिसरातील राजीव गांधी नगरातून गेले, त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून न आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली.
त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता रजिस्टर ला नोंद करण्यात आली आहे. मपोना/1412 वाघमोडे एम. एस. तपासीक अंमलदार याचा अधिक तपास करीत आहेत.
यासंबंधी उपयुक्त माहीती मिळून आल्यास एमआयडीसी पोलीस ठाणे फोनं- 021/2744641 वर लेखी/तोंडी स्वरूपात किंवा तपासिक अंमलदार म.पो.ना. वाघमोडे एम.एस. यांच्या 7517517027 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असा आवाहन करण्यात आला आहे.
