सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समिती, पत्रकार सुरक्षा समिती आणि अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद आवारातील भारतीय संविधान उद्देशिका कोनशिलेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनिय कार्याला अभिवादन करत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या स्तुत्य उपक्रमास पत्रकार कृती समितीचे अप्पासाहेब लंगोटे, पत्रकार सुरक्षा समितीचे
यशवंत पवार, इक्बाल शेख, राम हुंडारे, अक्षय बबलाद, सिद्धार्थ भडकुंबे, राजू बेळ्ळेनवरू, अमोल कुलकर्णी, रमजान मुलाणी, बापूताज पाटील, नागेश पासकंटी, गिरमल्ला गुरव, सलाऊद्दीन शेख, अशोक ढोणे, रवि कांसे, महेश जाधव, नरेंद्र कांबळे आदी पत्रकार बांधव तसेच सामाजिक व आर.टी.आय. कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.