सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या बागेश्वर येथील धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेस चार हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेणाच्या अभिषेक घालून निषेध करण्यात आला. इतिहासाचे ज्ञान नसताना इतिहास संशोधक होण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने अशा बुवा साधूंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
चार हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी एकत्र आले. यावेळी धीरेंद्र शास्त्री याच्या विरोधात घोषणा दिल्या. साधू बुवांनी आपल्या मठात दरबारात अध्यात्मचे काम करीत बसावे, समाजामध्ये जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू असून अशा ढोंगी साधू-बुवांना महाराष्ट्र सरकारचे पाठबळ मिळत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.
*****
