रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने 'आरोग्य व महिलांच्या समस्या' विषयी मार्गदर्शन

shivrajya patra

फलटण : रणरागिणी बहुउद्देशीय  सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण कृषि महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त सहकार्याने येथील श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलात महिला आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आले होती. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे दोन्ही प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर (हॉर्टी कल्चर), प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण (अॅग्रीकल्चर), सौ.सीमा शेडगे (रेक्टर मॅडम), जीवन शिंदे(अधीक्षक- श्रीमंत मालोजीराजे विद्यार्थी वसतिगृह) शिक्षिका स्टाफ, आणि बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. 

अभिजीत भालके  आणि डॉ. सौ. श्रुती विक्रांत थिटे यांनी विद्यार्थिनींबरोबर शिक्षिका स्टाफ यांना 'आरोग्य व महिलांच्या समस्या' विषयी मार्गदर्शन केले. 

यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्षा सौ. रझिया शेख, सचिव मारुती टकले, खजिनदार कैफ शेख, संचालिका. मुख्याध्यापिका शाहीन. इ. शेख, शरद पवार, राज चांदवडकर, सौ. माया बनसोडे, सौ. प्रीती शाह, सौ. अनिसा सय्यद यावेळी उपस्थित होते. 

To Top