" शाक्य संघ " चे संघटक अशोक दिलपाक भिमरत्न पुरस्काराचे मानकरी

shivrajya patra

सोलापूर : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनाच्या निमित्ताने प्रबोधन विचार मंच सोलापूर च्या भिमरत्न पुरस्कारांचं जल्लोषमय वातावरणात वितरण झालं. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अशोककुमार दिलपाक यांचाही समावेश होता. ते सेवानिवृत्तीनंतर " शाक्य संघ ," चे संघटक म्हणून करीत असलेल्या राज्यव्यापी सामाजिक कार्याची दखल घेत दिलपाक यांना भिमरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
प्रबोधन विचार मंच सोलापूर ने शनिवारी सायंकाळी येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात भिमरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजन केलं होतं. या सोहळ्यास राज्यसभेच्या नूतन खासदार डॉ. ज्योती वाघमारे, माता रमाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे चे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, रिपब्लिकन जनशक्ती प्रमुख पुणे चे शैलेश मोरे, प्रियदर्शन साठे, राष्ट्रीय एकता दल मुंबई चे अध्यक्ष बाबा न्यायनीत, प्रबोधन विचार मंच सोलापूरचे अध्यक्ष विश्वास गायकवाड आणि दीपक बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महामाता रमाई यांच्या प्रतिमेसमोर व तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.  

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटना प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर राज्यसभेच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा प्रबोधन विचार मंचचे अध्यक्ष विश्वास गायकवाड आणि दीपक बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

या सोहळ्यात खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा  नियोजित, शाक्य संघ, संघटक अशोककुमार दिलपाक  आणि शाक्य संघ‌‌‌ मिलिंद सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था दौंड चे अध्यक्ष अरुण ओहळ यांनी पुष्पगुच्छ, पंचशील उपरणे आणि कोरेगांव भीमा, शौर्य दिन 01 जानेवारी 2026 चा  शाक्य संघ, महाराष्ट्र विशेष अंक देऊन मुख्य विचारपीठावर सत्कार केला.

या भिमरत्न पुरस्कार सोहळ्यात अशोककुमार दिलपाक यांनी शाहू फुले आंबेडकर चळवळी सक्रियपणे सामाजिक, धार्मिक क्षेत्रात योगदान दिले आहे.  शाक्य संघ, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे महाराष्ट्रात  08 जिल्ह्यामध्ये संघटन करून रजिस्ट्रेशन करून घेतले. संपूर्ण महाराष्ट्रात " शाक्य संघ‌‌‌ ," वाढवण्याचा  त्यांचा मानस आहे. या कार्याची दखल घेऊन दीलपाक यांना गौरविण्यात आले.

नियोजीत 'शाक्य संघ' च्या माध्यमातून, 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तक दिन दीक्षाभूमी नागपूर , 01 जानेवारी शौर्य विजयस्तंभ भीमा-कोरेगांव, 14 जानेवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिन संभाजीनगर, 11 एप्रिल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती (ऐतिहासिक फुलेवाडा, पुणे), 14 एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 26 जून छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती कोल्हापूर या ठिकाणी महापुरुषांना सोलापूर, नागपूर, लातूर, बीड, संभाजीनगर, नांदेड, परभणी, पुणे, दौंड‌, ठाणे, मुंबई आदी जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना एकत्रित करून विशेष कोडमध्ये वाद्य पथक चे साह्याने त्या ठिकाणी पथसंचलन करून वाद्य वाजवून मानवंदना देण्याचे उपक्रम आजवर राबवले जात आहेत.  

शाक्य संघाचे संघटक अशोककुमार दीलपाक यांच्याबरोबरच शाक्य संघ, मिलिंद सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था दौंड जिल्हा पुणे चे अध्यक्ष अरूण ओहळ, नियोजित शाक्य संघ‌‌‌, माता रमाई महिला ब्रिगेड महाराष्ट्र राज्य च्या सल्लागार शकुंतला गायकवाड यांनाही भिमरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय एकता दल मुंबई चे अध्यक्ष बाबा  न्यायनित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद मसलखांब यांनी केले. या कार्यक्रमाकरिता हॉलमध्ये बौद्ध उपासक व बौद्ध उपासिकांनी हॉल गच्च भरलेला होता.

...... चौकट

प्रथम चळवळीतील कार्यकर्ता आणि जनतेची सेवक : खासदार डॉ. ज्योती वाघमारे

राज्यसभा खासदार म्हणून माझी निवड झाली असली तरी मी फुले, शाहू, आंबेडकर  चळवळीतील प्रथम कार्यकर्ता आणि जनतेची सेवक आहे, म्हणून मी अभिमानाने 'भीमराज कि बेटी' असल्याचे स्वाभिमानाने सांगते, असं भावनिक उद्गार खासदार डॉ. ज्योती वाघमारे  यांनी केले. त्या भिमरत्न आणि धम्मरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

*****

To Top