गॅस एजन्सी समोर गर्दी होऊ नये यासाठी कंपन्याकडून गॅस एजन्सींना वाढीव गॅस सिलेंडर पुरवठा करण्यात येणार आहे
नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा तुटवडा नाही
नागरिकांनी ई केवायसी घरी बसून ॲप द्वारे ऑनलाईन करण्याचे आवाहन
गॅस सिलेंडरची डिलिव्हरी झाली त्या दिवसापासून शहरी भागात एक गॅस धारक 25 दिवसात तर डबल गॅस धारक 35 दिवसात आणि ग्रामीण भागात 45 दिवसात गॅस सिलेंडरचा पुरवठा
अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या
0217-27311008 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा
सोलापूर/02 : सोलापूर शहरात बीपीसीएल, आयओसीएल व एचपीसीएल या तीन गॅस कंपनीच्या एकूण 20 गॅस एजन्सी कार्यरत आहेत. यातील 07 गॅस एजन्सी समोर नागरिक ई केवायसी साठी तसेच गॅस सिलेंडर साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे निर्देशनास आले आहे. तरी नागरिकांनी घरी बसून क्यू आर कोडच्या माध्यमातून ई केवायसी करावे व तर गॅस कंपन्यांनी गर्दी होणाऱ्या गॅस एजन्सींना वाढीव गॅस सिलेंडर पुरवठा करून त्या एजन्सीनी गॅस सिलेंडरचा पुरवठा घरपोच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
नियोजन भवन येथील सभागृहात गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या तसेच गर्दी होणारा शहरातील सात गॅस एजन्सी प्रतिनिधी यांच्या समवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक रघुकुमार, एचपीसीएलचे सागर चव्हाण व आयओसीएलचे सागर गौतम यांच्यासह गॅस एजन्सी चे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, जिल्ह्यातील गॅस एजन्सी समोर गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने 23 मार्च रोजी स्पष्ट आदेश दिले आहेत. तरी सोलापूर शहरातील काही ठिकाणी गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी रांगा लागत आहेत.
तसेच एजन्सीच्या म्हणण्याप्रमाणे ई केवायसी साठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ई केवायसी साठी प्रशासनाच्या वतीने क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांनी घरी बसूनच ऑनलाइन ई-केवायसी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सोलापूर जिल्ह्याच्या एलपीजी गॅस पुरवठा मध्ये बदल झालेला नाही, परंतु पॅनिक बुकिंग मुळे गॅस सिलेंडरच्या मागणीत अडीच पट वाढ झालेली आहे. त्यामुळे सिलेंडरचा पुरवठा करण्यात वेळ लागत आहे. पॅनिक बुकिंग कमी झाल्यानंतर लोकांना गॅस सिलेंडर वेळेत मिळणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. व गरज नसताना बुकिंग करू नये.
सोलापूर जिल्ह्यासाठी पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा मागणीप्रमाणे साठा उपलब्ध होत आहे. गॅस एजन्सी समोर सिलेंडर साठी येऊ नये, ऑनलाइन बुकिंग करावे व घरपोच सिलिंडर उपलब्ध करून घ्यावा. ज्या गॅस एजन्सी ना गॅस सिलेंडरचा अतिरिक्त साठा आवश्यक असेल त्यांनी तशी मागणी नोंदवावी व मिळालेला साठा हात ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांनाच घरपोच पोहोचवण्याचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी अतिरिक्त वाहने व डिलिव्हरी बॉय उपलब्ध करून घ्यावेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी निर्देशित केले.
गॅस एजन्सीमध्ये ई केवायसी करण्यासाठी तसेच बुकिंग ची माहिती विचारण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र उभारले जात असून यासाठी पुरवठा विभागाचे तीन कर्मचारी तसेच एचपीसीएल बीपीसीएल व आयओसीएल या कंपनीचा एक एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहे.
या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे गॅस सिलेंडरच्या अनुषंगाने आलेल्या तक्रारी विषयी त्यांचे निवारण करून समाधान करणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक रघुकुमार यांनी तिन्ही कंपन्यांच्या वतीने गॅस सिलेंडरची वाढीव मागणी असलेल्या गॅस एजन्सींना पुरवठा करण्यात येईल असे सांगितले. तसेच ग्राहक तक्रार निवारण केंद्रासाठी एक-एक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी म्हटले.
प्रारंभी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी सोलापूर शहरातील गॅस एजन्सी ची माहिती देऊन यातील सात गॅस एजन्सी समोर नागरिक मोठ्या प्रमाणावर रांगा लावत असल्याचे सांगितले.
सोलापूर शहरातील LPG ग्राहकांचे ekyc करणे प्रक्रिया व घरपोच सिलेंडर पुरवठा करण्याबाबत सूचना
आपण सोलापूर शहरातील अधिकृत एलपीजी ग्राहक आहात
कृपया आपले गॅस कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी ekyc करण्याबाबत आपण संबंधित gas एजन्सी मध्ये न जाता मोबाईल द्वारे ekyc ची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठीचा क्यूआर कोड प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सर्वप्रथम आपण खालीलप्रमाणे ऍप play स्टोर मधून डाउनलोड करावे
1.IOCL कंपनीचे जी ग्राहक असल्यास Indane Oil ONE हे ऍप डाउनलोड करावे
2.BPCL कंपनीचे ग्राहक असल्यास BPCL For Business हे ऍप download करावे
3.HPCL कंपनीचे ग्राहक असल्यास HP PAY हे ऍप download करावे.
वरील ऍप मध्ये माहिती भरून
Adhaar Face RD या appvarun प्रमाणित करून आपले ekyc त्वरित पूर्ण करून घ्यावे. तसेच आपली गॅस बुकिंग झाली असल्यास आपल्याला विहित वेळेत घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा होणार असल्यामुळे कृपया गॅस एजन्सी समोर रांगेत उभे राहू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांच्याकडून करण्यात आलं आहे.
***