एस. कार्तिकेयन यांनी जिल्हाधिकारी पदाचा स्विकारला पदभार; कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली

shivrajya patra
सोलापूर : सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे राज्य सरकारने गुरूवारी जबाबदारी सोपवली. त्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. 
पूर्वीचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. आशीर्वाद यांनी गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या काळात बाधीत वाडी-वस्ती अन् शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते. त्यांची कारकिर्द निरंतर स्मरणीय आहे. 
त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी सायंकाळी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढले.
कार्तिकयन हे मूळचे तामिळनाडूचे. २०२० च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी, प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून व्यावसायिक कौशल्य मिळवले. त्यांच्या या आर्थिक ज्ञानाचा प्रशासकीय कामात मोठा फायदा होऊ शकतो. 
मार्च २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती कोल्हापूर जिल्हा परिषदेत सीईओपदी झाली. ग्रामीण विकास आणि प्रशायकीय कामात त्यांनी गती आणली आहे. 
कोल्हापूरला जाण्यापूर्वी त्यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरशनमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अल्प काळ काम केले, कारकिर्दीच्या प्रारंभी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणूनही काम केले होते.
To Top