सोलापूर : बार असोसिएशनच्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ॲडव्होकेट ब्लॅक पॅंथर संघाने प्रथम क्रमांक विजय प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
कामगार सेना कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णु कारमपुरी, प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रशांत जक्का, तर ॲडव्होकेट ब्लॅक पॅंथर संघाचे कर्णधार ॲड. मुनिनाथ कारमपुरी, ॲड. सर्वश्री स्वप्निल पुंजाल, मनोज पामुल, महेंद्र वड्डेपल्ली, महिंद्र बंडी, महेश इंजामुरे, जयेश इंजामुरे, विनोद होनपोरके, रवी केळेकर, तुषार पामुल, श्रीनिवास बंडी, महेश येमुल, नरेंद्र भंडारी, राकेश कोम्पेंली, आकाश आमची, इरेश केचीगुंडी, धारना आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : बार असोसिएशनच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ब्लॅक पॅंथर क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकाविल्याबद्दल कामगार सेनेच्या वतीने कामगार सेना कार्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी, ब्लॅक पॅंथर क्रिकेट संघाचे कर्णधार ॲड. मुनिनाथ कारमपुरी, प्रसाद जगताप, विजेता ब्लॅक पॅंथर क्रिकेट संघ छायाचित्रात दिसत आहे.