सोलापूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार बहुजनांचे मुक्तिदाते विश्वभूषण भारतरत्न " डॉ. बाबासाहेब आंबेडकर " यांच्या 135 व्या जयंती सोहळा दिनानिमित्त आय.टी.आय. निदेशक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच रा.स.क.म. संघटनेचे संघटक सचिव बाळकृष्ण पुतळे आणि जिल्हा सरचिटणीस राजा सोनकांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
मंगळवारी, सकाळी आयटीआय निदेशक संघटनेच्या पुणे विभागाचे विभागीय संपर्कप्रमुख तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष विजयकुमार भांगे आणि राज्य कामगार विमा रुग्णालयाचे ज्येष्ठ नेते आणि संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रा.स.क.म. संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर,ज्येष्ठ नेते सटवाजी होटकर, भिमराव लोखंडे, चंद्रकांत चलवादी, प्रविण वाघमारे, लिपिक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. एन. गायकवाड, आरोग्य सेवा (चतुर्थश्रेणी) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर होनकळस, आशुतोष नाटकर, आर. जे. शिंदे,
आयटीआयचे भीमाशंकर कोंडगुळी, रामदास कडतण यांच्यासह पदाधिकारी आणि रा.स.क.म. संघटनेशी संलग्नीत असलेले खातेनिहाय संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.