कर्तबगार महिलांचा सन्मान होणे काळाची गरज : आमदार हेमंत ओगले

shivrajya patra



श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित नारी सन्मान सोहळ्यास सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची प्रमुख उपस्थिती

श्रीरामपूर/सलीमखान पठाण : समाजातील कर्तबगार महिलांचा गौरव आणि सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री- पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे.

श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आमदार ओगले बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, श्रीरामपूर नगर परिषदेने अतिशय स्तुत्य उपक्रम केला, मी त्यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचे म्हटले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे होत्या. सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती
यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानाने शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तळा-गाळातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांनी कार्य केले, त्या महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न नगर परिषदेने केला आहे. या पुढील काळात देखील श्रीरामपूर नगरपालिका महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला बालकल्याण समितीच्या सभापती मंजुश्री मुरकुटे यांनी केले तर स्वागत उपनगराध्यक्ष कांचन सानप यांनी केले. उपसभापती रागेश्वरी एडके यांनी शेवटी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले. 
यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, आशा दिघे, गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेविका निलोफर शेख, जायदाभी कुरेशी, प्रणिती चव्हाण, सोनिया कक्कड, नवनीतकौर सेठी, जाकीया शेख, शहाला शहा, यास्मिन शेख, वैशाली पोटे, जयश्री पाटील, आशा परदेशी, योगिता नागले, स्नेहल खोरे, सभापती राजेंद्र पवार, दिपक वमने, योगेश जाधव, गोपाल लिंगायत, माजी नगरसेविका मंगल तोरणे, संगीता मंडलिक, सुधा कांबळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरामपुरातील प्रतीक्षा कोते, कलावती देशमुख, तेजस्वी शिंगारे, डॉ. मोहम्मदी शफी शेख, प्रियंका निकम, विमल गिरमे, मीलाग्रीन कदम, मोनिका जैन, कोमल चौधरी, छाया भोसले, अनिता गायकवाड, दीपा भवर, योगिता महाले, तेजश्री डोखे, कल्पना शेलार, प्रियंका भिसे, शितलकौर टाक, कृष्णमाई भजनी मंडळ या महिलांना 'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले.

....चौकट....
शानदार नियोजन
पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मंजुश्री मुरकुटे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला दिनाच्या या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते. पहिल्यांदा आदिक सभागृह प्रेक्षकांनी फुल्ल झाल्याने पालिकेतील जे कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांना सभागृहाबाहेर जावे लागले.

To Top