पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई; अनधिकृत 938 भोंगे काढण्यात यश

shivrajya patra

सोलापूर : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मंदिर व मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 938 भोंगे पोलीस प्रशासनामार्फत काढण्यात आले.

ग्रामीण पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात मंदिर व मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत विविध ठिकाणी तपासणीसाठी विशेष मोहीम राबविताना नियमबाह्य लावण्यात आलेले भोंगे काढण्यात आले. 

यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मंदिरांवरील 581 भोंगे तसेच मशिदींवरील 357 भोंगे असे एकुण 938 भोंगे पोलीस प्रशासनामार्फत काढण्यात आले, ही कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू न देता अत्यंत शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने मोहिम राबविण्यात आली.

ही कारवाई शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी दोन्ही समाजातील नागरिकांनी कायद्याचा आदर ठेऊन सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. तसेच संबंधित धर्मस्थळांचे पदाधिकारी व विश्वस्त यांनीही कायद्याचे पालन करून सहकार्य केल्यामुळे ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण झाली.

या कारवाईमुळं सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण नियंत्रणास मदत होऊन सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राहण्यास मोठा हातभार लागला आहे. 

भविष्यातही कायद्याचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना केलं आहे. 

To Top