सोलापूर : येथील उत्तर तालुक्यातील मजरेवाडी गावंचे मूळ रहिवासी सिद्राम रामचंद्र लंगोटे यांचं शुक्रवारी,24 एप्रिल रोजी सकाळ पूर्वी अल्पशः आजारात निधन झाले. त्यांना गत सप्ताहात प्राकृतिक अस्वास्थ्यामुळं खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते मृत्यूसमयी 72 वर्षीय होते.
जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क, रेणुका नगरजवळील शेतात लंगोटे वस्ती इथं ते वास्तव्यास होते. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून दुपारी 3.30 वा. निघणार असून त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी, सून-नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष तथा तिसरी आँख मानवाधिकार संघटन, प्रदेशाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांचे वडील होत.
