'सावा' चे माजी अध्यक्ष संदीप जव्हेरी यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर : येथील रेल्वे लाईन्स परिसरातील जुने आरटीओ ऑफिस नजिकच्या राहत्या घरी संदीप अरविंदभाई जव्हेरी यांचं शुक्रवारी, 24 एप्रिल रोजी सायंकाळी अल्पशः आजारात निधन झाले. ते  मृत्यूसमयी 54 वर्षीय होते.  

जव्हेरी अॅडव्हर्टायझिंग सर्विसेस चे ते संचालक होते. सोलापुरातील जाहिरात क्षेत्रातील सावा या संघटनेचे ते माजी अध्यक्ष आणि सक्रिय सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. तसेच फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज मार्केटिंग अंथरप्रीनर्स या महाराष्ट्र राज्य संघटनेचे माजी उपाध्यक्षही होते.

त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. ते श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाचे गेली 25 वर्षे सहसचिव होते. तसंच इंडियन रेड क्रॉस सोसायटी सोलापूर सेंटर, भारती विद्यापीठ माजी विद्यार्थी, सेंट जोसेफ प्रशाला, माजी विद्यार्थी, रोटरी क्लब, अशा अनेक संस्थांवर ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, 2 विवाहित भाऊ, पत्नी, 2 मुली असा परिवार आहे. 

संदीप जव्हेरी यांचं पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. उदईक शनिवारी, त्यांची अंत्ययात्रा सकाळी 10 वाजता निघणार असून मोदी विद्युत दहिनी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असंही सांगण्यात आलंय.


To Top