‘आदर्श समाज भूषण’सह विविध पुरस्कारांचे वितरण; समाजसेवकांचा गौरव

shivrajya patra
निमित्त महात्मा ज्योतिराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष आणि संघर्षनायक मिडिया वर्धापन दिन सोहळ्याचं

सोलापूर/संतोष पवार : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष आणि संघर्षनायक मिडिया वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने समाजात भूषणावह उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या समाजसेवकांना ‘आदर्श समाज भूषण’ सह विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  

येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडलेल्या समाजसेवकांच्या गौरव सोहळ्यास सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, संघर्षनायक मीडिया संपादक संतोष आठवले, उपसंपादक चंद्रकांत मुळे, सागर माने आणि विनोद बनसोडे यांची विशेष उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्ती ना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
समाजकारण, लोकसेवा व सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “आदर्श समाज भूषण पुरस्कार 2026” प्रदान करण्यात आला. 
महात्मा ज्योतिराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष तसेच संघर्षनायक मिडिया यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यास मोठी गर्दी झाली होती व कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या पुरस्काराने कासेगाव येथील माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष रामहरी चौगुले व बोरामणीचे माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांचा गौरव करण्यात आला. समाजहितासाठी कार्यरत साप्ताहिक 'भगवा प्रांत' चे संपादक उमेश काळे यांना “आत्मसन्मान गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

ग्रामविकासासाठी प्रभावी नेतृत्व, पारदर्शक कारभार व लोकसहभागातून काम करणाऱ्या ग्रामपातळीवरील लोकप्रतिनिधींना “आदर्श उपसरपंच” व “आदर्श सरपंच” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये मुळेगावचे उपसरपंच शिवराज जाधव व बोरामणीच्या सरपंच अरुणा साळुंखे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कार्याचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
To Top