क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनीपत्रकार कृती समितीच्या वतीने अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समितीच्या वतीने येथील सुपर मार्केटसमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
 

यावेळी तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे आणि राम हुडांरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी अप्पासाहेब लंगोटे यांनी महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणाविषयक उचललेल्या कष्टावर ओझरता प्रकाश टाकून शब्द सुमनांनी अभिवादन केलं.

यावेळी सर्वश्री इक्बाल शेख, युनुस अत्तार, गिरमल्ला गुरव, अस्लम नदाफ, अक्षय बबलाद, विजयकुमार उघडे, विश्वनाथ बिराजदार, मोहन थळंगे, नरेंन सब्बन, साजिद मकानदार, जहिर नदाफ, सचिन कांबळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
To Top