‘संघर्ष यात्री’ साप्ताहिक दैनिकात रूपांतरित होऊन देशभर पोहोचावे : रमेश बारसकर

shivrajya patra
मोहोळ येथे ‘संघर्ष यात्री’ साप्ताहिकाच्या कार्यालयाचे उद्घाटन 

मोहोळ : हल्ली वृत्तपत्र चालवणे हे आव्हानात्मक काम आहे, मात्र ‘संघर्ष यात्री’ ने स्पर्धेच्या डिजिटल युगातही अडचणींवर मात करीत आपली अखंड वाटचाल सुरू ठेवली आहे. आगामी काळात हे साप्ताहिक दैनिकात रूपांतरित होऊन महाराष्ट्रासह देशभर पोहोचावे,  यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन रमेश बारसकर यांनी यांनी दिले.

येथील क्रांतीनगर इथं साप्ताहिक ‘संघर्ष यात्री’  च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. याप्रसंगी मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे, शिवसेना ओबीसी राज्य प्रमुख रमेश बारसकर आणि पत्रकार कृती समितीचे संस्थापक आप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बारसकर बोलत होते.
मोहोळ शहर आणि तालुक्यात अनेक साप्ताहिकांची सुरुवात झाली, त्यातील काही बंदही पडली, त्यास अपवाद ठरण्यासाठी साप्ताहिक ‘संघर्ष यात्री’ ने आपली वाटचाल निरंतर ठेवावी असं आवाहनही बारसकर यांनी यावेळी केले.
‘संघर्ष यात्री’ हे वृत्तपत्र सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत असून अन्यायाविरोधात परखड लेखणीने आवाज उठवत आहे. पुढील काळातही निर्भीड पत्रकारिता कायम ठेवत समाजातील चांगल्या व वाईट बाबींचा समतोल आढावा घ्यावा, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात सूचित केले. कार्यकर्ते घडविण्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही क्षिरसागर यांनी यावेळी अधोरेखित केले.
याप्रसंगी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब  लंगोटे यांनी ‘संघर्ष यात्री’ चे संपादक दशरथ काळे यांना 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट दिली.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय क्षीरसागर, कृष्णदेव वाघमोडे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख अशोक भोसले, नागेश पासकंटी, नितीन करजोळे, पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे, माजी नगरसेवक महादेव गोडसे, महादेव खिलारे, रणजीत भोसले, संजय आठवले, अशोक कांबळे, दिनेश सातपुते, किशोर वस्त्रे, नगरसेवक अजय कुरडे, चंद्रकांत गोडसे, सरफराज सय्यद, गणेश गावडे, अविनाश क्षीरसागर, सरपंच केशव वाघचवरे, माजी उपसरपंच सुभाष सोलंकर, संतोष बचुटे, नागनाथ बसाटे, श्रीकांत बसाटे आणि मानसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
***
To Top