'सांज' चे अविनाश कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते यशवंत फडतरे यांचा वाढदिवस साजरा

shivrajya patra

जिल्हा परिषद बागेत पार पडला अभिष्टचिंतनाचा सोहळा 

सोलापूर : येथील दैनिक 'सांज' चे संपादक अविनाश कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते यशवंत फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी, 15 एप्रिल रोजी पत्रकार कृती समिती, अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार आणि पत्रकार बांधवांच्या वतीने शाल- पुष्पहार घालून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आले.

याप्रसंगी तिसरी आंख मानवाधिकार संघटना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उभयतांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला.

पत्रकारितेच्या प्रारंभापासूनच्या वाटचालीतील ठळक अनुभवांना उजाळा देताना, वाटचालीत चढ-उतार येतील आणि जातील. प्रत्येकांनं आपापल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा मोलाचा सल्ला अविनाश कुलकर्णी यांनी सत्काराला उत्तर देताना उपस्थितांना दिला.

यावेळी पत्रकार इक्बाल शेख, नितीन करजोळे, युनुस अत्तार, मिलिंद प्रक्षाळे, गिरमल्ला गुरव, राम हुंडारे, अक्षय बबलाद, किर्तीपाल गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार सलाउद्दीन शेख, प्रशांत गायकवाड, विश्वनाथ बिराजदार, नितीन कांबळे, अशोक ढोणे, अक्बर शेख, प्रशांत गायकवाड,सोहेल जहागिरदार, अश्फाक शेख, नरेंन कांबळे, सिद्धार्थ भंडकुंबे, तसेच अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन करताना, मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

To Top