सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सांगता (विसर्जन) मिरवणूक रविवारी, 19 एप्रिल रोजी सोलापूर शहरात काढण्यात येणार आहे. मिरवणुकीमुळे मिरवणुक मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. या दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता खालील मार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम.राज कुमार यांनी दिलीय.
पोलीस आयुक्त एम.राज कुमार यांना प्राप्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चा अधिनियमन क्र. 22 चे कलम 33(1) (ब) नुसार प्राप्त अधिकारान्वये खालील आदेश दिले आहे.
रविवारी, 19 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. पासून ते 20 एप्रिल रोजीचे पहाटे मिरवणूक संपेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सांगता (विसर्जन) मिरवणुक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीस जाणे व येणेस बंद करण्यात येत असल्याचा उल्लेख या आदेशात आहे.
बंद करण्यात येणारा मार्ग
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सम्राट चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक
2. जुना पुना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
3. छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक सरस्वती चौक-चार पुतळा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-डफरीन चौक-जुना एम्प्लायमेंट चौक- वाडीया हॉस्पीटल चांदणी चौक महापौर निवास - रेल्वे स्टेशन गांधी पुतळा - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक - मेकॅनिक चौक
4. संगमेश्वर कॉलेज ते जुना एम्प्लायमेंट चौक
5. डी.एम. आर. ऑफीस ते जुना एम्प्लायमेंट चौक.
या मार्गावर मिरवणुकीत सामील होणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांचे वाहतुकीस तसेच या मार्गावर वाहन पार्कीगसाठी बंदी राहील.
(अपवाद- पोलीस वाहने, रुग्णवाहीका, अग्नीशमन दलाचे वाहने व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील अशी वाहने)
पर्यायी मार्ग
1) विजापूर रोडकडून हैद्राबाद, तुळजापुर, पुणेकडे जाणारी वाहतुक पत्रकार भवन चौक, महावीर चौक, गुरुनानक चौक - संत तुकाराम चौक, अशोक चौक, शांती चौक, जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड मार्गे इच्छित स्थळी
2) मंगळवेढाकडून येणारी होटगी रोड व विजापूर रोड कडे जाणारी वाहतुक, मरीआई चौक नागोबा मंदिर, रामवाडी पोलीस चौकी- मोदी बोगदा, पत्रकार भवन मार्गे इच्छित स्थळी
3) जुना पुना नाका चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनधारकाने जुना पुना नाका ( 54 मीटर रोड मार्गे) अवंती नगर - यश नगर रेल्वे बोगदा -जानकर नगर- सी.एन.एस. हॉस्पीटलमार्गे मरिआई चौक- ते इच्छित स्थळी
4) जुना पुना नाका चौकाकडून विमानतळ, जुळे सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकाने जुना पुना नाका, जुना कारंबा नाका- जुना तुळजापूर नाका- बोरामणी नाका, शांती चौक, गुरुनानक चौक, महावीर चौक ते इच्छित स्थळी
5) विजापूर, मंगळवेढा कडून येणारे जड वाहतुक वाहनधारकाने नवीन केगांव बायपास रोडचा वापर करावा.
6) अक्कलकोटकडून येणाऱ्या जड वाहतुक वाहनधारकाने नवीन अक्कलकोट नाका, शांती चौक, जुना बोरामणी नाका- मार्केट यार्ड या मार्गाचा वापर करावा, असं पोलीस आयुक्तांच्या आदेशात सूचित करण्यात आलं आहे.
या जाहीरनाम्याने काढलेला आदेश,19 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. पासून ते दिनांक 20 रोजीचे पहाटे मिरवणूक संपेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचा भंग करणारा कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र होईल, असंही पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी म्हटले आहे.
*****
