अझीम शेखचा सलग तीन वर्षांचा विक्रम; मलिक संदल पॉलिटेक्निकमध्ये रँक वनचा बहुमान

shivrajya patra
विजयपूर : येथील मलिक संदल पॉलिटेक्निक महाविद्यालयातील अझीम सत्तार शेख या विद्यार्थ्याने डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात संपूर्ण कॉलेजमध्ये रँक वन मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, त्याने प्रथम क्रमांक मिळवत आपला उत्कृष्ट कामगिरीचा विक्रम मागील सलग तीन वर्षांपासून कायम राखला आहे.
मूळचा सोलापुरातील अझीम सत्तार शेख याचे आई-वडील अशिक्षित असून, दीड वर्षांपूर्वी त्याचं पितृछत्र हरपलंय. त्याच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून मुलाला शिक्षण दिले. आई, आजी आणि मामाच्या परिश्रमाचं चीज करत अझीमने मेहनतीच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केलं आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या मालन मॅडम, विभागप्रमुख हसन जमादार सर, तसेच विनोद सर, इब्राहिम सर आणि अझहर सर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशाबद्दल अझीम शेख या विद्यार्थ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
To Top