शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगतीहोणार नाही, असा होता महात्मा फुलेंचा दृष्टीकोन : नेताजी खंडागळे

shivrajya patra
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची द्विशताब्दी जयंती बक्षि हिप्परगेत साजरी 

सोलापूर : 'विद्येविना मती गेली, मती विना निती गेली,  निती विना गती गेली, गती विना शुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले,' असा महात्मा फुले यांचा दृष्टीकोन होता, म्हणूनच शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होणार नाही, असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांनी व्यक्त केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षिहिप्परगे येथील महात्मा फुले तरुण  मंडळाच्या वतीने  क्रांतीसूर्य  महात्मा जोतिराव फुले यांची जयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. 

प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन बोरामणी गटाचे नुतन जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नेताजी खंडागळे बोलत होते.
खंडागळे यांनी त्यांच्या भाषणात, शिक्षणाचं महत्व अधोरेखित करताना, महात्मा फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा दिला. अन्य उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतात महात्मा फुले यांच्या जिवन कार्याचा आलेख मांडला.
या कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम माळी यांनी केले होते. यावेळी विचारपीठावर ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाला गावकरी महिलांची उल्लेखनिय उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  लक्ष्मण माळी, गोपाळ माळी, नवनाथ माळी, सिताराम माळी, नामदेव माळी, गणपत माळी, उमराबाई लक्ष्मण माळी, वैशाला नवनाथ माळी,
अमोल माळी, खंडू माळी, नामदेव माळी, दादासाहेब नामदेव माळी, दादासाहेब सुखदेव माळी, विष्णू माळी, दादासाहेब सिताराम माळी,
गणेश लक्ष्मण माळी, अनुराधा गोपाळ माळी, कल्पना नामदेव माळी, सपना अमोल माळी, अमोल नामदेव माळी, राजश्री गोविंद माळी, महानंदा दादासाहेब माळी, पूजा अजय माळी, जनाबाई नामदेव माळी, ज्योती तुकाराम माळी, छबाबाई गणपत माळी यांनी परिश्रम घेतले.
To Top