दगड खाणीच्या पाण्यात बुडालेल्या यश च्या शोध कार्यात तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत अपयश

shivrajya patra
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील श्रीहर्ष उपाख्य यश श्रीहरी हब्बू हा जिल्हा परिषद शाळेचा चौथीतील विद्यार्थी गुरुवारी, 12 मार्च रोजी दुपारी पोहण्यासाठी निघालेल्या
त्याच्या काका आणि काकांच्या मित्रांसोबत कासेगांव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील एका दगड-खाणीकडे गेला होता. 

त्यास काठावर बसवून सर्वजण पोहत थोड्या अंतरावर गेले असताना काठावर बसलेला यश पाण्यात पडून बुडाला. प्रारंभी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न झाला, त्यात तो हाती लागला नाही. या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. 
गुरुवारी दुपारपासून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली यश ची शोध मोहीम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पो.उ.नि. घोडके, पो.नि. देशपांडे डब्ल्यू पी.एस.आय. डोंगरीतोट, सुपे मॅडम, तलाठी हुडेवाले, सर्कल माळी, तहसीलदार किरण जगदाडे यांनी घटनास्थळाला भेट दिलीय. कासेगांवचे सरपंच  यशपाल वाडकर, एएसआय बाणेवाले घटनास्थळीच आहेत.

यशच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले, अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरवसे, फायरमन सचिन लोकरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेंड पाण्यात बुडालेल्या यश चा शोध घेत आहेत. स्थानिकचे ओंकार भोजने, सचिन गरड यांच्याकडील उपलब्ध कॅमेरे पाण्यात सोडूनही पाहिले. 

त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले यांनी त्यांच्याकडील उच्च दर्जाचा कॅमेरा जवळपास 70-80 फुटावर अधिक खोलवर सोडून पाहिले, गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली शोध मोहीम सकाळी सुरू झाली तर सायंकाळपर्यंत सुरू असते, शनिवारी सकाळपर्यंत यश ला शोधण्यात सर्वांना जणू अपयश आल्याचं दिसतंय.

शनिवारी सकाळपासून बोटीच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान  यश चा शोध घेत आहेत, पाण्यात खोलवर गळ सोडूनही पाहिलं जात आहे. त्यांच्या आजवरच्या कामातील अनुभवाच्या अनुषंगाने असलेल्या सर्व शक्यता पडताळून त्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आलंय.
To Top