मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान गुणवत्ता तपासणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांची कासेगांवला भेट

shivrajya patra

सोलापूर :मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या कामाची पाहणी व गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव इथं ग्रामपंचायत व विविध ठिकाणी भेटी दिल्या. या भेटीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शिस्त, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी कौतुक केले.

ग्रामीण भागाचा विकास व्हावा आणि गाव विकासाच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने अभियानाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केलंय. या गांव भेटीत मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी घरकुल, शोष खड्डे कर संकलन रोजगार हमीतील सुरू असणारी कामे याबाबत होणारा विलंब व अडचणीबाबत विचारणा केली. 

मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शिस्त भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता यासंबंधी कौतुक केले.

त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जनतेसाठी मिळणाऱ्या सुविधा, औषध उपचार आणि कर्मचाऱ्यातील सातत्य आणि वेळेवर उपस्थितीसंबंधीही त्यांनी सूचनाही दिल्या.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी गावातील प्रत्येक घटकाचा समावेश असणार आहे. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि गावकऱ्यांनी लोक वर्गणी लोकसहभाग वाढविण्याची आवश्यकता आहे.

प्रिसिजन फाउंडेशन व सेवावर्धिनी यांच्या सहभागातून गावात जलसंधारणाची कामे व सिमेंट बंधारे व नाला सरळीकरण कामे चालू असल्याने पंचायतराज अभियानास चालना मिळत आहे, असे सरपंच यशपाल वाडकर यांनी सांगितलं.

याप्रसंगी उपसरपंच शहाजहान शेख, असलम तांबोळी. जि. प. शाळेचे मुख्याध्यापक कोरे सर, डॉ. सायली चांदेकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, उपकेंद्र कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका- मदतनिस आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

To Top