जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड व शाळा दुरुस्ती कामाला सुरुवात : सेवा फाउंडेशनच्या प्रयत्नाला अखेर यश

shivrajya patra

 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 23 मध्ये जिल्हा परिषद शाळा लोकु तांडा शाळेचे वॉल कंपाऊंड तसेच शाळा नादुरुस्त झाल्यामुळे मागील अनेक वर्षापासून तेथील विद्यार्थी पालक व शिक्षक वारंवार मागणी करत होते. ही गंभीर बाब माजी. सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांना कळल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानं हा विषय मार्गी लावला.

या शाळेला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक गाड्या येण्या-जाण्याचा त्रास  होत होता. शिक्षकांची देखील वारंवार मागणी होती. त्यामुळे ०८ लाख रुपये निधीतून जिल्हा परिषद शाळेचे भूमीपूजन काम आज रोजी पार पडले.

या भूमिपूजन कार्यक्रमाला सौ. अर्चना आयगोळे  (मुख्याध्यापिका), हरी पवार,  मछिंद्र पवार, सुभाष पवार, नेहरू राठोड, सूरज राठोड, बंडू पवार, करण राठोड, राहुल राठोड अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top