कन्या नम्रताच्या विवाहानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन; शैक्षणिक साहित्याचंही वाटप

shivrajya patra
धाराशिव : येथील श्री स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना धाराशिव आयटीआय काॅलेजचे बापुराव जगताप यांनी आपली कन्या चि.सौ.कां. नम्रता आणि चि. अभिषेक यांच्या शुभ विवाहाच्या निमित्ताने मिष्टान्न भोजन दिले.

यावेळी आनंदित झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी नम्रता आणि अभिषेक यांना शुभ विवाह निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
जगताप परिवाराच्या या विशेष कार्याचे धाराशिव जिल्हा दिव्यांग शाळामधून कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भगवान चौगुले यांनी केले. या कार्यक्रमाकरिता धाराशिव जनता बॅकेचे ढगे, बिराजदार, बत्तुल यांनी प्रेरणा दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिमराव पाथरुड, विठ्ठल होरडे यांनी परिश्रम घेतले.
संस्थासचिवा लक्ष्मीबाई इटकर, मुख्याध्यापक शकिल शेख यांनी जगताप परिवाराचं अभिनंदन करत धन्यवाद दिले.
To Top