कर्जदाराला खलास करण्याची तर त्याच्या पत्नीलाही न सोडण्याची धमकी

shivrajya patra

सोलापूर : सावकारीच्या आडून महागडं घर बळकाविण्याच्या उद्देशानं नाममात्र 37,00,000 रूपयांची इसार पावती व खोट्या नोटरी करून घर बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हा भयावह प्रकार गतवर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घडला. कुमार जाधव आणि सोमनाथ जाधव अशी आरोपीतांची नांव असून उभयतांनी फिर्यादीच्या पत्नीस न सोडण्याची आणि तक्रार कर्त्यास खल्लास करण्याची धमकी देत हा प्रताप केल्याचं तक्रारीत म्हटलंय.

याबाबत पोलीस माहिती कक्षाकडून मिळालेली
अधिक माहिती अशी की, विजापूर रस्त्यावरील आरटीओ ऑफिस नजीकच्या विद्यानगरातील रहिवासी 51 वर्षीय सुरेश रामण्णा निंबागल व्यवसायाने एलआयसी एजंट म्हणून काम करतो. 

गतवर्षी,10 डिसेंबर रोजी दुपारी 12.00 वाजण्याच्या सुमारास सुरेश निंबागल साईबाबा चौक, लिमयेवाडी रोडकडून आपल्या घराकडे जात असताना, कुमार जाधव व सोमनाथ जाधव यांनी त्यांच्यासोबत बळजबरीने डी. आर. एम. ऑफिसजवळील बँक ऑफ इंडीया शाखेत घेऊन गेले. त्याच्या घरावर साधारण 36 लाख रुपये कर्ज आहे. त्यावेळी कुमार जाधव व सोमनाथ जाधव यांनी, तुमचे कर्ज आम्ही फेडतो तुम्ही काळजी करु नका, बिनधास्त रहा, असे म्हणून हनुमान मंदिर जवळ लिमयेवाडी येथे घेऊन गेले. 

उभयतांनी दुसऱ्या दिवशी, दुपारी 01.30 वाजण्याच्या सुमारास सुरेशला लिमयेवाडीतील हनुमान मंदिरजवळ बोलावून घेतले. 'तु आम्हाला तुझ्या घराचे साठे खत अगर इसारा पावती करुन द्यावे लागेल, नाही तर तुला सोडणार नाही, असे म्हणुन मला सोमनाथ जाधव याने गालात चापट मारली. 

त्यावेळी सुरेशच्या गाडीवर पाठीमागे कुमार जाधव हे बसले. त्यांनी गाडी कोर्टाजवळ घे, असे म्हणून सुरेशच्या शर्टची कॉलर पकडली. त्यावेळी सुरेशने घाबरुन त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टाजवळ जाणे पसंत केले. तेंव्हा सोमनाथ जाधव यांने त्यास तुला सांगितलं तेवढं कर नाही, तर तुला व तुझ्या बायकोला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तेंव्हा घाबरुन कोणताही कागद न वाचता सुरेश ने त्यांच्या सांगण्याप्रमाणे सह्या केल्या.


तिसऱ्या दिवशी, 12 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याचे सुमारास कुमार जाधव व सोमनाथ जाधव यांनी सुरेशला त्यांची कार क्रमांक MH-13/CS 1819 या चार चाकी कारमध्ये मारहाण करुन तुला खल्लास करीन, अशी धमकी देवून बळजबरीने बसवून विजापूर रस्त्यावरील विद्यानंद कॉ. ऑफ. बँक येथे घेऊन गेले. 

तेथे बँकेतून सुरेशच्या खात्यावरुन 5,00,000 रुपये असे दोन वेळा असे एकुण 10,00,000 रुपये काढण्यास सांगितले, त्याने 10,00,000 रुपये पैसे काढल्यानंतर सदरची 10,00,000 रुपये रक्कम कुमार जाधव व सोमनाथ जाधव यांच्या सांगण्याप्रमाणे गोट्या नावाच्या इसमास दिली. 

त्यानंतर उभयतांनी सुरेशला त्यांच्या गाडीत बसवुन तु आम्हाला 20,00,000 रुपये आताचा आता काय पण करु दे, नाहीतर तुला आता सोडणार नाही. आम्ही त्याच्या घरावर कब्जा करणार आहे, असे म्हणुन मला धमकी देऊन तेथुन निघून गेले. तसेच 25 लाख रुपयामध्ये माझ्याकडुन बळजबरी इसार पावती/नोटरीवर सह्या घेऊन कब्जा करणार आहेत, असंही सुरेश निंबागल असं तक्रारीत म्हटलं आहे.

सुरेश निंबागल यानं कुमार जाधव यांच्याकडून घेतलेल्या व्याजाचे पैसे, त्यानं रोख स्वरुपात व त्यांच्या खात्यावर 6,59,000 रुपये व सोमनाथ जाधव त्यांचे लाईट बिल व इतर असे एकूण 4,88,489 रुपये असे पैसे ऑनलाईन पाठविलेले आहेत. तरी देखील वारंवार पैसे देण्यासाठी मारहाण करतात व धमकी देतात, असं सुरेशच्या तक्रारीचा रोख आहे.

कुमार जाधव व सोमनाथ जाधव यांनी वेळोवेळी मारहाण करुन मला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कार क्रमांक MH-13 CS 1819 या चार चाकीमध्ये बळजबरी घेऊन जाऊन माझं स्वतःचं घर बळकावण्यासाठी मारहाणी धमक्या देण्याचे प्रकार करीत आहेत.

त्यास कंटाळून सुरेश ने कुमार यल्लप्पा जाधव आणि सोमनाथ विठ्ठल जाधव ( दोघे रा. लिमयेवाडी) यांच्याविरुध्द सलगर वस्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यानुसार उभयता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मसपोनि खामकर (नेम. सलगर वस्ती पोलीस ठाणे) या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top