डॉ. उम्मे यशफिन शिलेदार यांचं फिजिओथेरपी पदवीत उज्ज्वल यश

shivrajya patra
सोलापूर : डॉ. उम्मे यशफिन सलीम शिलेदार यांनी फिजिओथेरपी (B.P.Th) ही वैद्यकीय पदवी उत्कृष्ट गुणांसह यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांनी आपले शिक्षण श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सोलापूर येथून पूर्ण केले असून हे महाविद्यालय महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस (MUHS), नाशिक अंतर्गत कार्यरत आहे.

डॉ. उम्मे यशफिन यांनी शालेय जीवनापासूनच अभ्यासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्येही त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत रँकर म्हणून स्थान मिळवले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणातही त्यांनी सातत्यपूर्ण मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर उत्तम यश संपादन केले.

फिजिओथेरपीच्या शिक्षणादरम्यान त्यांनी पहिले, दुसरे, तिसरे आणि अंतिम वर्ष अशा सर्व वर्षांच्या परीक्षा ‘ऑल क्लिअर’ करत यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

या यशामागे त्यांची प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास हे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले जाते. दिवस-रात्र केलेल्या परिश्रमांमुळेच त्यांनी हे यश मिळवले आहे.

आपल्या यशाबाबत बोलताना डॉ. उम्मे यशफिन म्हणाल्या की, “हे यश केवळ माझे नसून आई-वडिलांचे आशीर्वाद, भावाचा पाठिंबा आणि मोठी बहिणी डॉ. हुजेफा शिबीन यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आहे. यामुळेच मला हे यश मिळाले. तसेच शिक्षकांचे मार्गदर्शनही खूप मोलाचे ठरले.”

त्या पुढे म्हणाल्या की, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक यश आणि मी केलेली मेहनत मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करते.”

त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हे डॉ. उम्मे यशफिन शिलेदार यांनी दाखवून दिलं आहे.
To Top