सोलापूर-श्रीशैलम बस सेवेचा शुभारंभ ...

shivrajya patra

सोलापूर श्रीशैलम गुरु-शिष्याचे नाते : विनायक महिंद्रकर

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने श्रीशैलम् येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ते श्रीशैलम बस सेवेचा शुभारंभ गुरुवारी, 05 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता सोलापूर बस स्थानक येथून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन शुभारंभ करण्यात आला.

आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे उगादी अर्थात गुढीपाडवादिनी मोठा यात्रा उत्सव भरत असतो. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर-जिल्ह्यातील असंख्य भाविक भक्त हे श्रीशैलम येथे जात असतात. त्यांच्या सोयीसाठी ही बससेवा सुरू करण्यात आलीय. सोलापूर श्रीशैलम यांचं गुरु-शिष्याचे नाते असल्याची श्रध्दा भाविकांत आहे.

याप्रसंगी सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सोलापूर शहर व जिल्ह्यातील भाविकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विनायक महिंद्रकर व सागर हिरेहब्बु यांनी संयुक्तपणे  केले आहे.

सोलापूर-श्रीशैलम ही एस. टी. बस पहाटे 05.30  वाजता सोलापूर बसस्थानक येथून सुटून सायंकाळी 07 वाजता श्रीशैलम येथे पोहोचते. या बसमध्ये पुश बॅक सीट असून मोबाईल चार्जरची ही व्यवस्था असल्याची माहिती चालक श्रीशैल शिरोळकर यांनी दिली.

याप्रसंगी सहाय्यक वाहतूक निरीक्षक कोळी वाहक जक्का, डेंगणे चालक महाडिक व सिद्धेश्वर सेवा संस्थेचे सिद्धाराम येणगुरे, किसन गर्जे, शैलेश बाभुळगांवकर, योगेश होळीमठ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

To Top