सिंगम च्या घरामध्ये चोरट्याचं धाडस; 4.5 लाखाच्या सोन्याच्या लॉकेटची चोरी

shivrajya patra

सोलापूर : चोरट्याने सिंगम यांच्या घरामध्ये धाडसानं प्रवेश करून सुमारे 4.5 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट चोरून नेले. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी दुपारी न्यु पाच्छा पेठेत पंचमुखी हनुमान मंदिरजवळील घरात घडलीय. या प्रकरणी 14 दिवसानंतर गुन्हा दाखल झालाय.

न्यु पाच्छा पेठेत पंचमुखी हनुमान मंदिरजवळील रहिवासी सुधाकर व्यंकटेश सिंगम यांचा मुलगा राहुल स्नानगृहात स्नान करीत असताना कोणीतरी चोरट्यानं घरात प्रवेश करून सुमारे 4, 50, 000 रूपये किंमतीचे जवळपास 29 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट चोरुन नेले. त्यामध्ये चौकोन पेंडल होतं, असंही सांगण्यात आलंय.

या प्रकरणी सिंगम यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरूध्द भा. न्याय संहिता कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top