एकात्मिक बाल विकास योजना उत्तर सोलापूरचा तळेहिप्परगा येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
सोलापूर : मूल जन्माच्या आधीपासूनच्या विविध सुविधा गरोदर माता आणि मूल जन्मल्यानंतर बालकांना अंगणवाडी मधून मिळतात. त्यातूनच सृदृढ बालक तयार होतात, असं पर्यवेक्षिका गुंड यांनी सांगितले.
उत्तर सोलापूर तालुका एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून तळेहिप्परगा गावातील अंगणवाडीत गुरूवारी, 05 मार्च रोजी महिला सक्षमीकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मार्डी 2 च्या पर्यवेक्षिका जयश्री गुंड यांनी महिला आणि बालकांना पूरक पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केले.
गावातील अंगणवाडीमध्ये महिला आणि बालकांसाठीच्या योजना आहेत, प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी गावातील गरोदर मातांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची ओटी भरण आणि अन्नप्राशन हा कार्यक्रम करण्यात आला. बालकांचे भरण पोषण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक महिलांना दाखवण्यात आले. 
त्यानंतर सृदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली नंतर 'एक पेड, माँ के नाम' या योजनेतून वृक्ष लागवड करण्यात आली. सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी तळेहिप्परगा ग्रामपंचायत सदस्या शोभा कांबळे, अंगणवाडी सेविका रंजना पाटोळे, शिला भोंडवे, सुज्ञानी राऊत, मनिषा होटकर, सुनिता देवकते तसेच मदतनीस सावित्रा माने, भाग्यश्री कांबळे, सुषमा गायकवाड, सुरेखा कांबळे, भारती राऊत यांच्यासह गरोदर माता आणि लहान बालके, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
