टोलनाक्याजवळ अपघात; तरुणाचा मृत्यू

shivrajya patra

मोहोळ/विष्णू शिंदे : सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वरजवळ रस्ते अपघातामध्ये दुचाकीवरील ३० वर्षीय तरूण गंभीररित्या जखमी झाला. त्यास रुग्णालयात दाखल केलं असता, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय. 

दत्तात्रय नागनाथ सावंत असं मृताचं नांव असून तो सोलापुरातील आमराई देशमुख-पाटील वस्तीतील रहिवासी असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. दत्तात्रय सावंत रात्रीच्या सुमारास सोलापूरहून मोहोळच्या दिशेने निघाला होता. तो टोलनाकाच्या अलीकडे अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झाला होता. या अपघाताची नोंद पोलिसात झालीय.

To Top