सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य तो कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडता यावा आणि त्यांचे प्रभावी पुनर्वसन व्हावे, यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात गुरूवारी, 05 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 02 या कालावधीत जिल्हा स्तरावर समुपदेशन शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे.

या शिबिरामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथील तज्ञ समुपदेशक/अधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या समुपदेशन शिबिराकरीता उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांनी केलं आहे.
