शाळा, पालक आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून घडविता येते विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य : समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर

shivrajya patra

“नूतन नगरसेवकांचा शाळेत सत्कार; शिक्षण विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची ग्वाही”

सोलापूर : शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे मूळ आहे. शाळा, पालक आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवता येते, असा विश्वास सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी व्यक्त केला.

अक्कलकोट रोड वरील, सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालय येथे सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक- ११ मधील नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास नगरसेवक युवराज सरवदे,  मीनाक्षी कडगंची व अजय पोन्नम आणि माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांची उपस्थिती होती. सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमात संस्थेचे कोषाध्यक्ष प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे, आप्पू कडगंची, मुख्याध्यापक विनोद वर, मुख्याध्यापक अविनाश भालशंकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. राजकुमार हंचाटे यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांना आवश्यक त्या सुविधा द्याव्या, असं आवाहन त्यांनी नगरसेवकांना केले.

अजय पोन्नम यांनी परिसरातील पायाभूत सुविधा आणि शाळांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे  सांगितले. तसेच पर्यावरणाचे व प्रदूषणाचे परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

शिक्षण क्षेत्रात अधिक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज अण्णासाहेब भालशंकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन साहेबलाल लालखां यांनी केले.

हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सत्कार समारंभास उपस्थित असलेल्या पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक  समन्वयातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवता येते, असा विश्वास सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी व्यक्त केला.

अक्कलकोट रोड वरील, सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालय येथे सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक- ११ मधील नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास नगरसेवक युवराज सरवदे,  मीनाक्षी कडगंची व अजय पोन्नम आणि माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांची उपस्थिती होती. सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या कार्यक्रमात संस्थेचे कोषाध्यक्ष प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे, आप्पू कडगंची, मुख्याध्यापक विनोद वर, मुख्याध्यापक अविनाश भालशंकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. राजकुमार हंचाटे यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांना आवश्यक त्या सुविधा द्याव्या, असं आवाहन त्यांनी नगरसेवकांना केले.

अजय पोन्नम यांनी  परिसरातील पायाभूत सुविधा आणि शाळांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे  सांगितले. तसेच पर्यावरणाचे व प्रदूषणाचे परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

शिक्षण क्षेत्रात अधिक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज अण्णासाहेब भालशंकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन साहेबलाल लालखां यांनी केले. हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सत्कार समारंभास उपस्थित असलेल्या पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. 

To Top