महिला दिनानिमित्त आशा मराठी विद्यालय आणि धर्मण्णा सादूल प्रशालेत 209 महिलांची मोफत नेत्र चिकित्सा

shivrajya patra
महिला दिनानिमित्त आशा मराठी विद्यालय आणि धर्मण्णा सादूल प्रशालेत 209 महिलांची मोफत नेत्र चिकित्सा

सोलापूर : जागतिक महिला दिनानिमित्त निलम नगर येथील आशा मराठी विद्यालय व धर्मण्णा सादूल प्रशालेत शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालय बाळे यांच्या सहयोगाने महिला पालकांची नेत्र चिकित्सा करण्यात आली. 
या शिबिरात 209 महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 45 महिला पालकांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. महेश पवार यांनी 45 महिलांच्या नेत्राची शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार असल्याचं सांगितले.

या नेत्र चिकित्सा शिबिराचं उद्घाटन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका सौ. सारीका खजूरगी,  सौ. कविता गज्जम, सौ. अकिला भागानगरी, उद्योजिका सौ. रूपाली कोळी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लिमबानो पठाण, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अफरीन सय्यद प्रमुख उपस्थित होत्या.  

शाळेतील पालकांची काळजी घेणाऱ्या संस्थेचं काम कौतुकास्पद आहे. अशा शाळा विरळ आहेत, असे गौरवोद्गार उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले. 

विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील शिक्षिका आणि माता पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या नेत्र तपासणीसाठी डाॅ. महेश पवार डाॅ. गिरीराज गज्जलवार डाॅ. सत्यम राखुंडी आणि डाॅ. प्रियंका कांबळे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तबस्सुम सय्यद तर  स्वप्नाली जाधव यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.
To Top