04 वर्षापासून रस्ता अर्धवट... ! शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

shivrajya patra

शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रश्न सोडवण्याचे सरकारचे आदेश

सोलापूर : करमाळा तालुक्यातील कंदर- सातोली हा अडवलेला शिवरस्ता तातडीने दुरुस्त करून देण्यात यावा, अन्यथा शुक्रवारी, 06 मार्च रोजी याच रस्त्यावर आत्मदहन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने पाणंद रस्ते, शिवरस्ते बाबत शासन निर्णय (जीआर) जारी केलेले आहेत. त्यामध्ये मुख्यतः शेत रस्ते, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, शिवरस्ते आणि पाऊल रस्त्यांच्या हक्काबाबत शेतकऱ्यांमध्ये वाद-विवाद निर्माण झाल्यास त्याबाबत चौकशी करून योग्य तो आदेश आणि निर्णय देण्याचे अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत. मात्र तहसीलदार ने हा 'प्रॉब्लेम सॉल' न केल्यामुळे या रस्त्यावर अवलंबित शेतकऱ्यावरती आत्मदहनाची वेळ आली आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंदर सातोली हा शिवरस्ता पारंपारिक असून या रस्त्यावर आमच्या शेत, घर व शाळा आहे, परंतु गेल्या 04 वर्षापासून या रस्त्यावर काही संबंध नसणाऱ्या संतोष फरताडे व बिभीषण उर्फ दादा फरताडे यांनी येणाऱ्या  जाणाऱ्यांची अडवणूक करून येथे असणाऱ्या ओढ्यातील वाहून गेलेला रस्ता भरण्यास अडथळा केला आहे. 

त्याचप्रमाणे पुढे जाणारा हा रस्ता गणेश फरतडे व दीपक फरतडे  यांनी हा रस्ता अत्यंत अरुंद केला असून तो भरण्यास अडथळा करत आहेत. त्यामुळे हा रस्ता बंद पडला आहे. या संदर्भात प्रांत अधिकारी यांच्याकडे 2023 सालापासून तक्रार करूनही अद्यापपर्यंत या रस्त्याची पाहणी करण्यात आलेली नाही, अथवा मदत केली नसल्यामुळे आमचे आर्थिक, शैक्षणिक मोठे नुकसान झाले असल्याने, आम्हाला जगणे नकोशी झाले आहे.

त्यामुळे सहा तारखेपर्यंत हा रस्ता भरून द्यावा, अन्यथा शुक्रवारी, 06 मार्च रोजी कुटुंबासह याचा रस्त्यावर आत्मदहन करणार असल्याचे नागनाथ चव्हाण, सिद्धेश्वर गोडसे, हनुमंत साळुंके, राजेंद्र जगताप, सचिन जाधव, दशरथ बारबोले, शिवाजी साळुंके अजित फरताडे , संतोष पवार यांनी सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचे कळवण्यात आले आहे. या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यासह पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेल्या आहेत.

... चौकट

रस्त्यासाठी आत्मदहन... !

2023 सालापासून आम्ही घराकडे आणि शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्याकरिता तहसीलदार, प्रांत यांच्याकडे मागणी करत आहोत, मात्र आमचा हा प्रश्न सोडवला जात नाही. आम्हाला आमचा हक्काचा रस्ता करून मिळावा, याकरिता आम्ही अडवलेल्या रस्त्यावरच आत्मदहन करत आहोत.

नागनाथ चव्हाण, शेतकरी

To Top