सोलापूर : सामान्य नागरीकांना साथीदारांसह मारहाण, दमदाटी, सामान्य नागरीकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, अवैध व्यवसाय (मटका जुगार) चालवून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अरुण प्रभाकर रोडगे याला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून 02 वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.
अरुण रोडगे याच्याविरुध्द सन 2023, 2024, 2025 आणि 2026 या कालावधीत अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्याविरुध्द सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन 25 फेब्रुवारी रोजी अरुण प्रभाकर रोडगे (वय-57 वर्षे, रा. 153, मुरारजी पेठ, मंगळवेढेकर चाळ, सोलापूर) यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केलं आहे.
