विद्यापीठ नामांतर दिनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय " शाक्य संघ‌‌‌ ," ची मानवंदना

shivrajya patra

छत्रपती संभाजीनगर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे नामांतर दिनी, 14 जानेवारी रोजी प्रथमच विशेष ड्रेस कोडमध्ये नियोजित, " शाक्य संघ‌‌‌," सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य, नियोजित " शाक्य संघ‌‌‌," माता रमाई महिला ब्रिगेड महाराष्ट्र राज्य,

नियोजित "शाक्य संघ‌‌‌' वाद्य पथक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य, म्युझिक अकॅडमी छत्रपती संभाजीनगर, यशसिद्धी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, व समता सैनिक दल, छत्रपती संभाजीनगर 

यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित प्रथमच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर नामांतरदिनी या ठिकाणी पथसंचलन करून वाद्य पथकसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार, बिगुल वाजून मानवंदना देण्यात आली  तसेच नामांतर लढ्यात जे शहीद झालेले आहेत, त्यांच्या शौर्य स्तंभाला वाद्यपथकाने शोक धून  वाजवून त्यांच्या हौताम्याला मानवंदना दिली.

याप्रसंगी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, नामांतर दिनाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय लोकशाहीचा विजय असो, नियोजित " शाक्य संघ," सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांचा विजय असो, नियोजित- " शाक्य संघ," माता रमाई महिला ब्रिगेड महाराष्ट्र राज्य चा विजय असो , यशसिद्धी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चा विजय असो,  अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून ठेवला.

या ठिकाणी आयु. चंद्रकांत दिलपाक  (सेवानिवृत्त पोलीस  उप अधीक्षक, जालना),  दादाराव मोरे ( सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, छत्रपती संभाजीनगर), कैलास खिलारे (सचिव, यशसिद्धी आजी-माजी सैनिक, महाराष्ट्र राज्य.), अशोककुमार दिलपाक (शाक्य संघ, संघटक महाराष्ट्र राज्य.), अंकुश पंडित (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर), 

रमेश गायकवाड (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर), दादाराव खरे (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर) यांनी नामांतर दिनाबाबत प्रत्येकाने आपापले मत व्यक्त करून नामांतर दिनाचा संघर्षमय अन् प्रेरणादायी इतिहास उपस्थितांपुढं ठेवला.

याप्रसंगी मंदाकिनी दिलपाक (अंबड, जालना), भगवान वाहुळे, अशोक गायकवाड, नागेश माटे, किशोर माटे, सुरेश साबळे, अशोक ठोकळ, कल्याणराव भंडारे, सोनाजी शिंदे, श्रीपती मस्के, बाबासाहेब घोडके, अशोक सोनवणे, गौतम वाघमारे, गौतम जाधव, 

भैय्यासाहेब निसर्गध, तानाजी शिनगारे, अरुण जाधव, संगीता शिंदे, रत्नप्रभा भंडारे, उर्मिला मस्के, साळवे मॅडम , कल्पना वाघमारे, दैवशाला जाधव, संजीवनी मिरपगार‌ (सर्व "शाक्य संघ‌‌‌, सम्राट अशोका सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी, बीड.) 

रवींद्र मगर (बुलढाणा), दिलीप गंगावणे (छत्रपती संभाजीनगर) इत्यादी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर, समता सैनिक दल छत्रपती संभाजीनगर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सोलापूर, . बीड, संभाजीनगर आणि बुलढाणा येथील बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी विशेष ड्रेस कोडमध्ये हजर होते.

To Top