नव्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

shivrajya patra

 

सोलापूर : दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या MH-13 FA मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे सुरु करण्यात आली आहे. वाहनांची नवीन मालिका सुरु होण्याच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी ही पूर्वनियोजनात्मक प्रक्रिया राबविण्यात येत असून नागरिकांना पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा, यासाठी विहीत शुल्कासह अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

⬆️ अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे: 

⬆️ दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 ते सायं. 4.00 या वेळेत कार्यालयीन दिवशी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. 

⬆️ अर्जासोबत क्र.16 अन्वये जारी केलेला डीडी, पत्त्याचा पुरावा, आधार लिंक झालेला मोबाईल क्रमांक, ओळखपत्र व पॅनकार्ड याच्या साक्षांकित प्रती अनिवार्य आहेत. 

⬆️ डीडी फक्त "Dy R.T.O. SOLAPUR" यांच्या नावे नॅशनलाइज/शेड्यूल्ड बँकेचा असावा.

⬆️ लिलाव प्रक्रिया : 

⬆️ एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 16 जानेवारी 2026 रोजी सायं. 5.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. 

⬆️ यादीतील अर्जदारांनी 19 जानेवारी 2026  रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात लिलावासाठीचा डीडी सादर करावा. 

⬆️ लिलावासाठीचा डीडी रुपये 300 पेक्षा कमी रकमेचा नसावा. 

⬆️ 19 जानेवारी 2026  रोजी दुपारी 4.00 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रक्कमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक वितरीत केला जाईल.

⬆️ महत्वाचे निर्देश: 

⬆️ एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. 

⬆️ राखीव क्रमांकासाठी अर्ज केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन सादर करून नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. 

⬆️ कोणत्याही परिस्थितीत राखीव क्रमांकासाठी दिलेली फी परत करता येणार नाही किंवा समायोजन करता येणार नाही.

दुचाकी वाहनांसाठी MH-13 FA मालिकेचे वेळापत्रक  

⬆️ 16 जानेवारी 2026 – तिप्पट शुल्काचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकृती (वेळ: सकाळी 11 ते सायं. 4.00

⬆️ 16 जानेवारी 2026 – सायं. 5.00 वा. अर्जांची यादी जाहीर

⬆️ 19 जानेवारी 2026 – दुपारी 2.00 पर्यंत लिलावासाठीचे रु. 300/- पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे

⬆️ 19 जानेवारी 2026 – तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी व परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जांचा लिलाव दुपारी 4.00 वाजता.

नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करावा, असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

To Top