उत्तर सोलापूर/ संतोष पवार : तालुक्यातील दारफळ (गावडी) चे उपसरपंच कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाळराजे पाटील, इंद्रजीत पवार, संभाजी दडे, अनंत सुभेदार, विनायक सुतार, जीवन साठे, तुषार साठे, केशव माने, सतीश सुर्वे, अनिल शितोळे, शाहीर पवार, बापू गाडेकर, महेश कदम, विष्णू उंबरे यांच्यासह असंख्य खेळाडू व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पारितोषिक 41, 044 रुपये (अविनाश मार्तंडे), द्वितीय पारितोषिक 31,044 रुपये (अनंत सुभेदार), तृतिय पारितोषिक 21, 046 रुपये (बापू गाडेकर – अजिनाथ पवार) तर चतुर्थ पारितोषिक 12, 044 रुपये (अनिल दारेगोळ – व्यंकटेश्वरा कन्स्ट्रक्शन) असं ठेवण्यात आलं आहे. यासह इतरही बक्षिसांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेत के. के. भाईजान दारफळ (गावडी), ओंकार सी. सी. (बाळे), समर्थ सी. सी. (बाळे), जगदंब सी. सी., डी. एस. बॉस (केगांव), जय किसान ॲग्रो (कौठाळी), एस. पी. (कळमण), समर्थ सी.सी. नरोटेवाडी, कुलदैवत वडाळा, आर. सी. सी. (नान्नज), यशराज (पडसाळी), आय. पी. टायगर (मार्डी) आदी संघांनी सहभाग घेतला असून सामने लीग पद्धतीने खेळविण्यात येत आहेत.
या स्पर्धेच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना स्पर्धा परीक्षांचे व विशेषतः पोलीस भरतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन शारीरिक व कौशल्य विकासाची संधी मिळावी, तसेच तालुक्यातील युवकांनी सोलापूरच नव्हे तर देश-विदेशातही आपलं नाव उज्वल करावं, असं मत उपसरपंच कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले.
एकूणच दारफळ गावडी येथे आयोजित या क्रिकेट स्पर्धेमुळे क्रीडा क्षेत्रात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून युवकांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे.


