बसवजयंतीपूर्वी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारा; अन्यथा लाक्षणिक उपोषण

shivrajya patra

सोलापूर : येथील बसवेश्वर सर्कल (कोंतम चौक) येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसव जयंती, 19 एप्रिलपूर्वी उभारण्यात यावा, या मागणीसाठी बसवभक्त शनिवारी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्यात अनेक संघटनांचा सक्रीय सहभाग राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा परिसर नूतनीकरणाच्या कामाचा भाग म्हणून गेल्या वर्षी तेथून हलवण्यात आला होता. एक वर्ष लोटले तरीही तो अद्याप बसवण्यात आलेला नाही. बसवेश्वर पुतळा आहे, तसाच आहे. त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले नाही. पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम देखील सुरू करण्यात आले नाही. पुतळ्याभोवतीच्या संरक्षक भिंतीचे काम देखील अर्धवट आहे. 

यामुळे तमाम बसव भक्तांच्या मनात महापालिका प्रशासनाविषयी संतापायी भावना निर्माण झालीय. प्रशासनाच्या दिरंगाईविरुद्ध रोष प्रकट करण्यासाठी बसव भक्त शनिवारी, 31 जानेवारी रोजी बसवेश्वर सर्कल (कोंतम चौक) येथे सकाळी  10 वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. 

या लाक्षणिक उपोषणात महाराष्ट्र वीरशैव सभा, अखिल भारतीय लिंगायत महासभा, महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान (जुळे सोलापूर), शंकरलिंग महिला मंडळ, अक्कनबळग महिला मंडळ, बसव केंद्र, श्रीमद् वीरशैव महाजन सभा, सिद्धसंग प्रतिष्ठान, वीरशैव जेष्ठ नागरीक संघ, बसव सेंटर, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, वीरशैव सेवा संघ, बसवेश्वर सर्कल मित्र परिवार, बसव ब्रिगेड, वीरशैव व्हिजन या संघटना सहभागी होणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

To Top