नेताजी खंडागळे यांचं जनसंपर्क कार्यालय ठरेल लोकाभिमुख कार्याचं केंद्र : महेश बिराजदार

shivrajya patra

सोलापूर : बोरामणी येथील नेताजी खंडागळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क आणि संवाद, लोकाभिमुख कार्य व विकासाभिमुख वाटचालीसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेश बिराजदार यांनी व्यक्त केला.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथं नेताजी खंडागळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आणि सह्याद्री फाऊंडेशनच्या माध्यमातून नेताजी खंडागळे यांनी आजवर केलेल्या कार्यावर आधारित दिनदर्शिकेचं प्रकाशन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेश बिराजदार यांच्यासह अन्य विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष महेश बिराजदार बोलत होते. बिराजदार यांच्यासह उपस्थितांनी नेताजी खंडागळे यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सरपंचपती डॉ. राज साळुंखे, सोसायटी चेअरमन भारत कवडे, सोसायटी चेअरमन वजीर मुजावर,  माजी संरपच राजू हलसगे, कमलाकर भोसले, लहुजी सेना अध्यक्ष सुधाकर पाटोळे, माजी सरपंच माणिक नन्नवरे, किसन मस्के, लक्ष्मण जाधव, नागनाथ बिराजदार, अतुल कवडे, मल्लिनाथ पटणे, नितीन माशाळे, दिलीप आचलारे, अभिमन्यू भगरे, वैभव हलसगे, नाना भोसले, रतन शिंदे, विलास वाघमारे, अतुल आवटे, माऊली वाघमारे, 

गौतम गायकवाड, बालाजी पवार, संजय पवार, अमित मोरे, संजय पाटील, विशाल शिंदे, नागेश सुरवसे, उपसरपंच हणमंत सरडे, नितीन मोहिते, संतोष स्वामी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच बोरामणी, मुस्ती, उळे, कासेगांव यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top