सोलापूर : मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही विजापूर वेस येथील चौकात मानकरी आणि मानाच्या सात काठ्या आणि पालखीवर पुष्पवृष्टी करत आपली दरवर्षीची परंपरा जपली. हिंदू-मुस्लिम एकता कायम टिकावी, जातीय तेढ वाढू नये, समतेचा संदेश जावा यासाठी दरवर्षी मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येतो. 
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज त्यांची यात्रा सध्या सुरू असून आज 68 लिंगाच्या तेलाभिषेकसाठी मानाचे साथही नंदीध्वज हिरेहबू वाड्यातून निघाले होते. दरम्यान विजापूर वेस येथून जाताना सातही नंदीध्वजाचे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून स्वागत करण्यात आले. तसेच पंच कमिटी आणि हिरेहब्बूंचा सत्कार करण्यात आला. 
या प्रसंगी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, राम गायकवाड, बशीर सय्यद, राजू हुंडेकरी, सरफराज शेख, मौला शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
... म्हणूनच शिवछत्रपतींचं नाव जगभरात आहे; मुस्लिम मावळ्यांकडून जिजाऊ जयंती साजरी
सोलापूर : जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजीमहाराज रयतेचं राज्य निर्माण केले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण दिली, म्हणूनच शिवछत्रपतींचं नाव जगभरात आहे. असं मत शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड कडून राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त लक्ष्मी मार्केट येथे अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांच्या हस्ते जिजाऊ पुजन करण्यात आले. याप्रसंगी हाजी बागवान बोलत होते.
जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, बशीर सय्यद ,तन्वीर गुलजार, गफूर शेख, रिजवान दंडोती ,लक्ष्मण भोसले, रियाज पैलवान, सादिक शेख, मुख्तार लालकोट, सरफराज शेख, मौला शेख आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून 04 हुतात्म्यांना अभिवादन
सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेले सोलापूरचे थोर सुपुत्र 04 हुतात्म्यांना हुतात्मा दिनाचे औचित्य साधून सोमवारी, 12 जानेवारी रोजी सोलापूरचे मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून अभिवादन करण्यात आले.

