04 हुतात्म्यांना पत्रकार कृती समितीच्यावतीने अभिवादन

shivrajya patra

सोलापूर :  हुतात्मा दिनानिमित्तानं, 12 जानेवारी रोजी येथील हुतात्मा पुतळा चौक येथील 04 हुतात्म्यांना पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

देशात स्वातंत्र्याची पहाट होण्यापूर्वी 1930 साली 09, 10 व 11 मे असे सलग तीन सोलापूर शहराने दिवस स्वातंत्र्याचा अनुभव घेतला. या ऐतिहासिक लढ्यात मोलाची भूमिका बजावणारे सोलापूरचे 04 थोर सुपुत्र हुतात्मे, मल्लप्पा धनशेट्टी, किसान सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना ब्रिटीशांनी, 12 जानेवारी 1931 रोजी येरवडा तुरुंगात फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस सोलापूर शहरात ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो. 

यावेळी पत्रकार कृती समितीचे पत्रकार सैपन शेख, अशोक ढोणे, गिरमल्ला गुरव, मोहन थळंगे, सिद्धू पुजारी, नरेंन कांबळे, बालाजी चिटमिल आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

To Top