सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख यांचं मंगळवारी, 30 डिसेंबर रोजी सकाळी वृध्दापकाळात निधन झाले. त्या मृत्यूसमयी 92 वर्षीय होत्या.
त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 04 वाजता काळजापूर मारुती येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. देगांव रोडवरील बायपास जवळ असलेल्या देशमुख मळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या त्या आजी होत.
