पाण्याच्या कारणावरून पत्रकारास मारहाण

shivrajya patra

मोहोळ : पाणी सोडण्याचे कारणावरुन एका पत्रकारास मारहाण झाल्याची घटना येथील बागवान गल्लीत शनिवारी सकाळी 9.30 वा. च्या सुमारास घडलीय. या प्रकरणी मोहोळ पोलिसांकडे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासीन अहमद अली अत्तार असं फिर्यादीचं नांव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील बागवान गल्लीत होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात पत्रकार या नात्याने यासीन अत्तार यांनी वेळोवेळी आवाज उठविला होता.

त्याचा रोष मनात धरून नागनाथ गल्लीतील रहिवासी रियाज आयुब मुलाणी याने यासीनला शनिवारी सकाळी शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने मारहाण केली.

याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार मोहोळ पोलिसांनी अदखलपात्र गु. रजि. नं. 2164/2025भा, न्या. सं. कलम 115(2),352,351 (2), (3) अन्वये तक्रार दाखल केलीय. पोलीस निरीक्षक शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार क्षीरसागर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

***

To Top