सोलापूर : मानवाधिकार दिनानिमित्त मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते तसेच पत्रकारांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला. 
बुधवारी, 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण हॉल येथे मानवाधिकार दिनी मानवाधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांचा वार्षिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात अनेक मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि पेन देऊन गौरविण्यात आले. पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या संपूर्ण सोहळ्याचे सुबक सूत्रसंचालन मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी प्रभावीपणे पार पाडले. मानवाधिकार जागृतीचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचवत सोलापुरातील हा सन्मान सोहळा अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी मानला जातोय.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य अध्यक्ष प्रवीण चांदेकर, परदेश कार्यकारी अध्यक्ष परवेज मुल्ला, पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख, जिल्हा अध्यक्ष अजहर बिजापुरे, शहर सचिव सलीम मुजावर, शहर संपर्क प्रमुख मीर महमूद खान, शहर संघटक फयाज अब्दुल गनी मुल्ला, जहीर शेख, मुदस्सर ओरसाण, पत्रकार बिपिन दीड्डी, श्रीनिवास वंगा, नागनाथ गणपा व नरेश सब्बन यांनी विशेष अथक परिश्रम घेतले.

