गैबीपीर उर्दू प्राथमिक शाळेत फुड फेस्टिव्हल साजरा

shivrajya patra

सोलापूर : होटगी रोड येथील गैबीपीर उर्दू प्राथमिक शाळेत फुड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. फेस्टिव्हलच्या उद्घाटन ॲड. अहमदसाब सिराज अहमद बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. 

या फुड फेस्टिवलच्या उपक्रमांत शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे चवीचे बनवलेल्या खाद्य पदार्थांचे विद्यार्थ्यांनी 50 स्टॉल लावण्यात आले होते. 

या कार्यक्रमास वाइस ऑफ मिडियाचे प्रमुख तौफिक नदाफ, समाजसेवक हाजी कासीम सय्यद, हाजी सादिक पिरजादे, मौलाना मुजमिल आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अ. मजीद शेख यांनी पाहुण्याचे स्वागत केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका निलोफर शेख, तहसीन चाँदा, शबाना जमादार,  अकबर मुतवल्ली, सलमा नदाफ, मसरत शेख,  शब्बीर शेख आदींनी परिश्रम केले.

To Top