राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाची मानकरी बंजारा एक्सप्रेस 'पूजा' चा भव्य सत्कार

shivrajya patra
सोलापूर : येथील वसुंधरा महाविद्यालयाची विद्यार्थीनी पुजा तुळशीराम राठोड हिने हरियाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देण्यात पूजा राठोड हिचा सिंहाचा वाटा आहे. बंजारा एक्सप्रेस असा लौकिक प्राप्त केलेल्या पुजाचा भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर सचिव प्रकाश राठोड यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला.

सोलापूरसह महाराष्ट्राची मान उंचावणारी बंजारा एक्सप्रेस पूजा राठोड यांनी नुकतेच हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना १०० मीटर धावणे आणि २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात भारतातून चौथ्या क्रमांकावर तर ४×१०० मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक घेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्याची मानकरी ठरलीय.

सोलापूरच्या ग्रामीण भागातून येणारी पूजा राठोड ही लहानपणापासूनच खिलाडू वृत्तीची आहे. पूजाची खिलाडू वृत्ती पाहून दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक कुडले सर यांनी तिला प्रशिक्षण दिले. एवढेच नव्हे तर शेतकरी असणारे पूजाचे वडील तुळशीराम राठोड यांनी आपल्या लेकीसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे स्वतःच्या एक एकर शेतात मैदान उपलब्ध करून देत शेतकरी बापानं मनाचा मोठेपणा दाखविला आहे.

माझी लेक खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविली पाहिजे, या महत्त्वकांक्षी पित्याची आशा पल्लवीत करणारी लेक पूजा राठोड हिने सोलापूरसह महाराष्ट्राची मान उंचावली आहे. 

भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर सचिव प्रकाशभाऊ राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात ऍथलेटिक्स खेळाडू कु. पूजा राठोड हिचा भव्य सत्कार करून त्याच्या आई-वडिलांचं देखील कौतुक केले. यावेळी भाजपा पक्ष कार्यकर्ते आणि सेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

खरंच पूजाने आपल्या समाजाबरोबर सोलापूर जिल्ह्याचे देखील नाव रोशन केले आहे. त्याबद्दल पूजा राठोड व तिच्या आई-वडिलांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

To Top