सोलापूर : येथील युनियन ऊर्दू प्राथमिक शाळेत नजीर मुन्शी, अय्यूब अहमद नल्लामंदू, नजीर अजीज शेख, महिबूब तांबोळी यांच्या दस्ते हवेत फुगे सोडून क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कै. बाबुराव डिसले जीवन गौरव पुरस्कार जाहिर झाल्याने नजीर अजीज शेख यांचा पुणेरी पगडी व शाल घालून विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक अल्ताफ जकलेर तर पाहुण्यांचं स्वागत नजीर शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जावेद काजी यांनी केले. शेवटी जावेद गढवाल यांनी सर्व उपस्थितांचं आभार केले. 
यावेळी फरहान नल्लामंदू, आएशा शेख, इंडीकर, अयाज चौकी उपस्थित होते .
