शासनाच्या जन आरोग्य योजनेतून रुग्णावर उपचार; Apex दवाखान्याने उकळले रुपये 45 हजार

shivrajya patra

सोलापूर : येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाखाली उपचार करून रुग्णाच्या नातेवाईकाकडून जवळपास 45 हजार रुपये उकळल्याचा प्रकार बेमुदत उपोषणाने उजेडात आलाय. श्रीमती नागरबाई शशिकांत जाधव या 65 वर्षीय वृद्ध महिलेवर उपचार करताना ही आर्थिक लुबाडणूक झाली असल्याचे आंदोलनकर्त्या गायकवाड कुटुंबियांचा Apex हॉस्पिटल प्रशासनावरील आरोप आहे. हॉस्पिटलच्या गैर कारभाराविरुद्ध शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी विनायक गायकवाड यांनी केलीय.

वांगी रस्त्यावरील शहा नगर हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी विनायक अशोक गायकवाड यांची सासू श्रीमती नागरबाई शशिकांत जाधव या ज्येष्ठ महिलेवर अपेक्स हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मंजुरी व उपचार झाले होते.

त्या दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने या नात्याकारणातून रुग्णाच्या नातेवाईकांची दिशाभूल करून 45 हजार रुपयांची आर्थिक लुबाडणूक केली. याविरुद्ध त्या योजनेचे आरोग्य मित्राकडे तक्रार ही करण्यात आली. 

त्यावर शासनाच्या योजनेतून उपचार करताना हॉस्पिटल प्रशासन आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या जनतेकडून आर्थिक लुबाडून करीत असल्याचा प्रकार पुढे आला होता.

वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा तपासणीस गेल्यावर रुग्णांच्या नातेवाईकाकडून जवळपास अडीच हजार रुपयांहून अधिक रकमेची लुबाडणूक करण्यात आली असल्याची तक्रार विनायक गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदवली असून त्यात रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये विनाकारण डांबून ठेवण्यात आले असल्याची तक्रारही त्यावेळी विजापूर नाका पोलीस ठाण्याकडे करण्यात आली होती.

त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची जाणीवपूर्वक मानसिक व आर्थिक लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारीवर त्या हॉस्पिटलचा परवाना रद्द होणे, शासकीय योजनेच्या नावाखाली सामान्यांची आर्थिक लुबाडणूक झाल्याचे दिसून आले असताना कोणतीही कारवाई न झाल्याच्या तसेच तेथील योजना रद्द करण्याचे गांभीर्य शासनाने न दाखविल्याच्या निषेधार्थ विनायक गायकवाड याचा सोमवारी, 29 डिसेंबर रोजीपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे गायकवाड कुटुंबीयांनी उपोषणस्थळी बोलताना सांगितले.

To Top